FILE PHOTO 
मराठवाडा

विद्यार्थी म्हणतात, आश्रमशाळेतील जेवण नको रे बाबा... 

शिवचरण वावळे

नांदेड : पूर्वी आश्रमशाळेतच जेवण तयार करण्याची परंपरा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असायचे. आश्रमशाळेत जेवणातून होणारी विषबाधा टाळण्यासाठी उपाय म्हणून शासनाकडून एका खासगी कंपनीला जेवण तयार करण्याची निविदा काढली असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जात आहे. यावर खुद्द शासनाची देखरेख असल्याचे सांगितले जाते. तरीदेखिल आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा होण्याचे प्रमाण काही कमी झाले नाही. 

काही दिवसांपूर्वीच पूर्णा येथील एका आश्रमशाळेतील ३२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यापाठोपाठ शुक्रवारी किनवट तालुक्यातील इस्लापुर सहस्त्रकुंड येथील ‘एकलव्य रेसिडेंसिअल स्कूल’ मधील पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा झाली. यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळुन निघाले. 

आश्रमशाळेतील जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह?
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शासनाने जेवण तयार करण्यासाठी दिलेल्या खासगी संस्थेस जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सोबतच शासनाकडून जेवणाची तपासणी केली जाते का? असा सवाल देखिल विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे. 

का होते जेवणातुन विषबाधा 
शिळा भाजीपाला ताजा टवटवित रहावा म्हणून त्यावर अल्कोहोलची फवारणी केली जाते. त्यामुळे वरून ताजा टवटवित दिसणाऱ्या भाजीपाल्यावर विषारी किटकनाशकांचा मारा असतो. बाजारातुन जेव्हा हा भाजीपाला घरी आणला जातो, तेव्हा त्या फळभाज्यांना गरम पाण्याने धुवून घेतले जात नाही. शिवाय फळे आणि भाज्यावर अळ्या पडलेल्या असतात. त्या अळ्यांची विष्टा जेवणात मिसळते. त्याचा थेट परिणाम अन्न खाणाऱ्यावर होतो आणि पोटात दुखणे, मळमळ, उलटी, जुलाब अशी लक्षणे दिसून येतात. 

अन्नवर बुरशी तयार होणे 
कोबी, टोमॉटो, शिळी पोळी अशा तयार अन्न पदार्थावर दुष्परिणाम करणारी बुरशी तयार होते. तसेच जेवणाची भांडी अस्वच्छ असल्यास त्याचा थेट परिणाम पोटावर आणि पचनसंस्थेवर होत असतो. यामुळे पोट दुखणे उलटी, मळमळ, जुलाब लागणे हे प्रकार दिसून येतात.

अशी टाळता येईल आश्रमशाळेत अन्नातुन होणारी विषबाधा
बहुतेक आश्रमशाळेला मोठी जागा असते. शाळेत शिक्षण घेणारी मुलेदेखिल शेतकरी व सामान्य कुटुंबातीलच असतात. तेव्हा या विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळावे हा सर्वांचा मुख्य उद्देश असला तरी तसे होत नाही. म्हणून आश्रमशाळेच्या परसबागेत कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेंद्रीय शेती करण्यावर भर दिला जावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषमुक्त भाजीपाला खायला मिळेल. शिवाय शाळेत असल्यापासून मुलांना शेंद्रीय शेतीबद्दल आवड निर्माण होईल. 
-डॉ. देविकांत देशमुख, वरिष्ठ कृषी शास्त्रज्ज्ञ. 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT